शेतकरी आणि सिंह

शेतकरी आणि सिंह

bookmark

एके वर्षी एका जंगलात एक भयंकर सिंह राहत होता. एके दिवशी हरणाचा पाठलाग करत असताना तो रस्ता चुकला. रस्ता चुकलेले सिंह गावाबाहेरील शेतात घुसला. शेतकरी शेतातच राखण करीत उभा होता. शेतात घुसलेल्या सिंहाला आपण पकडावे असे शेतकऱ्याला वाटले. असा विचार मनात आल्याबरोबर त्याने शेताच्या कुंपणाचे दार बंद केले. शेतकऱ्याने आपल्याला कोंडीत पकडल्याचे लक्षात येताच सिंहाने त्या शेतकऱ्याची मेंढरे मारून टाकली. मेंढयाची शिकार संपताच सिंहाने बैलांवर हल्ला केला. हे पाहून शेतकऱ्यालाच खूप भीती वाटायला लागली. त्याने तात्काळ दरवाजा उघडला. सिंह लगेच पळून गेला शेताचे, मेंढ्यांचे आणि बैलांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली. इतका वेळ घरात उभे राहून सारा प्रकान बघणारी शेतकऱ्याची बायको पुढे आली. ती म्हणाली, 'तुम्ही स्वतः इतके घाबरट असताना तुम्ही सिंहाला पकडण्याचा विचार कसा केला. आहो, लांबूनसुद्धा सिंहाची डरकाळी ऐकली तरी तुम्ही थरथर कापता. अशा घाबरट माणसाने अशी कृत्ये करण्याच विचारही मनात आणता कामा नये.' हे ऐकुन शेतकरी पुनः कामाला लागला. तात्पर्य - आती तिथे माती