धूर्त बोकड
एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता.
सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत.
बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही.
बैल बोकडाला म्हणाला ,"मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन ." बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा मागितली.
तात्पर्य - आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.
