उंटाचा नाच

उंटाचा नाच

bookmark

           एका जंगलात खूप प्राणी रहात होते. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचा बेत ठरवला. या कार्यक्रमात सर्वांनी आपणास येणारी कला सादर करण्यची असे ठरवण्यात आले. प्रत्येक प्राणी त्या दिवसाची उसुकतेने वाट बघत होता. अखेर तो दिवस उजाडला. कार्यक्रम सुरु झाला. प्रत्येक प्राणी येऊन आपला कलेचे प्रदर्शन करू लागला.  

       अखेर माकडाची वेळ आली. माकडाने सर्व प्राण्यांना खुश केले. त्याने अनेक कसरती करून प्राण्यांना आनंदित केले. प्रत्येकाला आश्चर्य वाटले. सर्व प्राण्यांनी माकडाची स्तुती केली. त्याच्या कलेचे कौतुक केले. सर्वच प्राण्यांनी त्याला टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला.

        एक उंट हे सगळे लांबून बगत होता. त्याने माकडासाठी  टाळ्याही वाजवल्या नाहीत आणि त्याचे अभिनंदनही केले नाही. तू मनातल्या मनात माकडाचा द्वेष करू लागला. माकडापेक्षा चांगली कला सदर करण्यासाठी आणि सर्व प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उंट नाचू लागला. 

       आपल्या नाचण्याच्या कलेतून सर्व प्राण्यांचे मन जिंकण्याचा उंटाने प्रयत्न  केला पण उंटाचा  नाच उरलेल्या प्राण्यांना आवडला नाही. सर्व प्राण्यांकडे दुर्लक्ष करून तो नाचतच राहिला. नाचाला कंटाळलेल्या प्राण्यांनी उंटाला मारून  काढले. उंटाचा अपमान करून त्याला हाकलून दिले.  

  तात्पर्य - कलेचा आदर करावा