तीन गाढवांचा भार

तीन गाढवांचा भार

bookmark

बादशहा अकबर व त्याची दोन मुले आंघोळ करण्यासाठी नेहमी नदीवर जात असे. बऱ्याच वेळा बिरबलही या राजघराण्यातील कुटुंबाबरोबर सोबतीला जात असे. एकदा नेहमीप्रमाणे ते यमुना नदीवर आंघोळीसाठी बिरबलला सोबत घेऊन गेले. अकबर व त्याची दोन्ही मुले नदीच्या पाण्यात उतरली. बिरबल नदीच्या काठावर त्यांचे कपडे घेऊन उभा होता. बिरबल शांतपणे नदीच्या काठावर उभा होता व बाकीचे सर्वजण नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद घेत होते. अकबर नेहमीच बिरबलला सतावण्याची संधी शोधत असे. तो शांतपणे त्याच्या मुलांना म्हणाला, 'आपण बिरबलची मजा घेऊ या.' मग तो बिरबलला बोलला, 'बिरबल तू धोबीच्या कपडयांचा भार उचललेल्या गाढवासारखा दिसत आहे.' बिरबलने तात्काळ उत्तर दिले, 'महाराज ! धोबीच्या गाढवाजवळ फक्त एकाच गाढवाचा भार असतो, परंतु माझ्याकडे तीन - तीन गाढवांच्या कपडयांचा भार आहे.' बिरबलचे उत्तर ऐकून अकबर निरूत्तर झाला.