मुर्खाची यादी
अकबरला घोडे सवारी आवडत असे. त्याला आवडणाऱ्या घोड्यांच्या पालनपोषणासाठी तो पाहिजे ती किंमत देत असे. दुरदुरचे व दुसऱ्या देशातील व्यापारी आपल्या सुंदर व बलवान घोड्यांबरोबर राजदरबारात भेट देत असे. स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी निवडलेल्या घोडयांसाठी महाराज चांगली रक्कम मोजत असे. तो आपल्या लढाऊ सैन्यासाठी देखील घोडे घेत असे परंतु, ते सर्व त्याच्या आवडीचे नव्हते. घोडयांचे व्यापारी राजदरबारातील किफायतशीर व्यापरामुळे, संतुष्ट होते. एके दिवशी, घोडयांचा एक व्यापारी काही उधार पैसे मागत होता. तो व्यापारी नवीन होता व इतर सर्व व्यापाऱ्यांच्या समुदायात अनोळखी होता. त्याने दोन अतिशय सुंदर व बलवान घोडे अकबरला विकले आणि बोलला, माझ्याकडे अशा सारख्या वंशाचे शंभर पेक्षा जास्त घोडे आहेत. फक्त हया घोडयांच्या रकमेची अर्धी रक्कम मला आधी दयावी. अकबरने खजिनदाराला आज्ञा दिली की त्या नवीन व्यापाऱ्याला तो मागेल तेवढी रक्कम त्याला दयावी. तो खजिनदार त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी आपल्या कार्यालयात घेऊन गेला. अकबर इतकी मोठी रक्कम त्या व्यापाऱ्याला आधीच देत आहे हे कोणालाही आवडले नाही. परंतु दरबारातील कोणीही व्यक्ती यावर काहीही बोलत नव्हते. सर्वांनी बिरबलला या विषयात लक्ष घालावे असे सांगितले. बिरबल सुध्दा या पैशाच्या देण्याने समाधानी नव्हता. तो अकबरला बोलला, 'काल तुम्ही मला राज्यातील मुर्खाची यादी बनवायला सांगितले होते माफी असावी परंतु या यादीत अव्वल स्थानावर तुमचे नाव आहे.' सर्व दरबाऱ्यांसमोर व इतर लोकांसमोर बिरबलने अकबरचा अपमान केला त्यामुळे अकबरचा चेहरा रागाने लाल झाला व तो चिडला. मला मुर्ख म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली?' अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला. 'क्षमा असावी महाराज, 'बिरबल बोलला. त्याने आपले डोके अकबरसमोर टेकविले व बोलला 'तुम्ही माझे डोके कापा जर तुम्हाला असे वाटत असेल की मी चुकीचे बोलत आहे.' अकबरने आपल्या उजवा हात वर करून त्याचे पहिले बोट बिरबलकडे केले. हे बघून दरबारात उपस्थित असलेल्या सर्व दरबाऱ्यांनी आपला श्वास रोखून धरला व त्यांना वाटले की महाराज आता बिरबलचे डोके कापणार, महाराजांना मुर्ख बोलण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. परंतु, अकबरने बिरबलच्या खांदयावर आपला हात ठेवला. त्याला बिरबलच्या बोलण्याचे कारण जाणून घ्यायचे होते. बिरबलला हे समजले व तो बोलला, 'तुम्ही माझ्या मुर्खाच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे कारण तुम्ही त्या नव्या वापाऱ्याला मोठी रक्कम देण्याची आज्ञा केली होती. व त्या व्यापाऱ्याची ओळख आपण पडताळून सुध्दा बघितलेली नव्हती. तो तुम्हाला फसवत होता. तो पुन्हा येथे येणार नाही. कदाचित तो दुसऱ्या एखादया राज्यात स्थायिक होईल व त्याला शोधणे अवघड जाईल. असा काहीही करार करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला ओळखणे जरूरी आहे. त्या माणसाने फक्त आपल्याला दोन घोडे विकले आणि तुम्ही त्याच्या मोहात पडले व त्याला खूप मोठी रक्कम दयायला तयार झाले. हेच कारण आहे की त्यामुळे मी तुम्हाला मुर्खाच्या यादीत अव्वल स्थान दिले. लवकर खजिनदाराकडे जा व त्या नवीन व्यापाऱ्याला पैसे देण्यापासून त्याला थांबवा, अकबरने आदेश दिला. दरबारी पळाले व खजिनदाराला महाराजांचा आदेश सांगितला. आता 'मी तुमचे नाव माझ्या मुर्खाच्या यादीत टाकणार नाही.' बिरबल बोलला, अकबरने काही वेळ बिरबलकडे बघितले व त्यानंतर दरबारातील लोकांकडे टक लावून बघितले व हसायला सुरूवात केली. सर्व लोकांना मुक्त झाल्यासारखे वाटू लागले. कारण, अकबरला त्याच्या चुकिची जाणीव झाली होती. त्याने बिरबलची स्तुती केली.
