अंधांची संख्या

अंधांची संख्या

bookmark

एक दिवस, अकबरने बिरबलला विचारले - " बिरबल, पूर्ण विश्वात कोणाची संख्या अधिक आहे, जे लोक बघु शकतात त्यांची की जे अंध आहेत त्यांची?' बिरबल बोलला, 'महाराज! यावेळेला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे मला शक्य नाही परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, विश्वात बघु शकणाऱ्यांपेक्षा अंधाची संख्या अधिक असेल.' अकबरने बिरबलला सांगितले, 'तुला तुझे म्हणणे सिध्द करावे लागेल. बिरबलने हसत हसत अकबरचे आव्हान स्वीकारले. दुसऱ्या दिवशी, बिरबल बाजाराच्या मधोमध एक न विणलेली लाकडी खाट घेऊन बसला आणि ती विणायला सुरूवात केली. आजूबाजूला दोन माणसं कागद व पेन घेऊन बसली होती. इथे काय होत आहे ते बघण्यासाठी थोडया वेळात तिथे गर्दी जमु लागली. तिथे उपस्थितीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने बिरबलला एक प्रश्न विचारला, 'बिरबल तुम्ही हे काय करत आहात?' बिरबलच्या दोन्ही बाजूला बसलेले माणसं असा प्रश्न विचारणाऱ्यांचे नाव विचारून ते लिहित होते. जेव्हा अकबरला ही गोष्ट समजली की बिरबल भर रस्त्यात खाट विणत आहे, तेव्हा लगेच अकबरही तिथे पोचला व त्यानेही तोच प्रश्न विचारला हे तू काय करत आहेस? अकबरच्या प्रश्नाचे काहीही उत्तर न देता बिरबलने आपल्या बाजूला बसलेल्या एकाला बाहशहा अकबरचे नाव लिहिण्यास सांगितले. तेव्हा अकबरने त्या माणसाच्या हातातील कागदाचा गठ्ठा घेतला. त्यावर लिहिलेले होते - 'अंध लोकांची यादी.' अकबरने बिरबलला विचारले, 'या यादीत माझे नाव का लिहिले आहे?' बिरबल बोलला, 'महाराज ! आपण बघितले की मी खाट विणत आहे, तरीपण तुम्ही मला प्रश्न केला की - मी काय करत आहे?' अकबरने बघितले की बघु शकणाऱ्या लोकांच्या यादीत एकही नाव नव्हते, याउलट अंध लोकांची यादी पूर्ण भरलेली होती. बिरबल बोलला, 'महाराज ! आता तर तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असाल की विश्वात अंधांची संख्या जास्त आहे.' बिरबलच्या या चतुराईवर अकबरने स्मितहास्य केले.