मुलगा आणि आई
एका गावात एक कुटुंब राहत होते. ते खूप धार्मिक होते. त्याची पत्नी खूप धार्मिक असल्यामुळे ते खूप दान-धर्म करत असतात. त्यांना एक मुलगा असतो. परंतु त्याला देव-धर्म करणे आवडत नसते.
एक दिवस त्याची आई त्याला मंदिरात एका साधूचे प्रवचन ऐकण्यासाठी त्याला पाठवते. त्याच्या आईला आशा वाटते की प्रवचन ऐकण्यामुळे तरी मुलात काही बदल होईल, ती त्याला प्रवचन ऐकण्याच्या बदल्यात पैसे देण्याचेही वचन देते. मुलगा पण तिचे ऐकतो आणि मंदिरात जातो. पण मंदिरात जाऊन प्रवचन ऐकण्याएवजी तो मंदिरात झोपतो.
दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देते. तिला वाटते आपल्या मुलाने त्या साधूला घरी बोलावले असेल पण तो तसे काहीच कले नाही. तो ते पैसे घेऊन बाहेरगावी जाऊन व्यापार करण्याचे निर्णय घेतो . त्याची आई त्याला नको जाऊ सांगते पण मुलगा तिचे काही ऐकत नव्हता .
तो बोटीत जात असतो आणि समुद्रात अचानक वादळ येते.बोट इकडे तिकडे भरकटू लागते. ती बोट पाण्यात बुडते, त्यात तो मुलगा पण बुडतो. आईचे न ऐकल्याची त्याला किंमत मोजावी लागते.
तात्पर्य - मोठ्यामाणसंचे ऐकल्याने फायदा होतो.
