संन्यासी

संन्यासी

bookmark

         एका गावात एक छोटे कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात एक बाळ जन्माला येते. त्या बाळाचे नाव ठेवले होते राम. तो राम असामान्य होता. तो पुढे खूप शिकला व नामवंत झाला. एक दिवस त्याने घरा-दाराचा त्याग केला. संन्यास घेतला आणि मग त्याने कठोर तपश्चर्या केली. त्याचा त्याग, कठोर तप याविषयीच्या अनेक कथा पसरल्या. देवाला सुद्धा ते कळले होते. देवाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. देवाने त्याची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. एकदा तर अशी वेळ आली कि त्या संन्याशा जवळ खायलाही काही नव्हते. 
      
        देवाने दुसरे रूप घेऊन काही खायला मागितले. संन्याशाने त्याच्याजवळ होते ते सर्व देवाला देऊन टाकले. 
हे सगळे हाल झाले तरी संन्याशी न संतापता शांतच राहिला. देवाने त्याची विविध प्रकारे परीक्षा घेतली. देव त्यांच्यासमोर प्रकट झाला आणि म्हणाला, ' कोणाताही वर माग!' 

           संन्यासी म्हणाला, 'देवा, मला असा आशीर्वाद दे कि मी चांगल्या मार्गापासून ढळणार नाही!' देव संतुष्ट झाला. त्याला देवाने सन्मार्ग न सोडण्याचा आशीर्वाद दिला. देव अंतर्धान पावला.