पाण्याचा झरा
एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे नोकर कासावीस होऊ लागतात . त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. व्यापारी विचार करतो कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे. व्यापाऱ्याला हायसे वाटते.व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागताच नाही व्यापारी म्हणतो आणखी थोड खोद व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते. तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते.
