चांगल्या मनाचा माणूस
एका गावात एक श्रीमंत माणूस राहत असतो. तो माणूस खूप दानशूर होता. तो दारात आलेल्या कोणत्याच याचकाला विन्मुख पाठवत नसत . त्याच्या या स्वभावामुळे तो प्रसिध्द झाला. देव सुध्दा त्याचा हा दान करण्याचा उपक्रम पाहत असतात. देव देखील त्याच्या औदार्यामुळे त्याच्यावर प्रसन्न असतात. देवांचा राजा म्हणतो 'आपण त्याच्या या स्वभावाची परीक्षा घेऊयात. तो श्रीमंत मनुष्य जर गरीब झाला तर आपला उदार स्वभाव आपली उदार वृत्ती टिकवतो का ते पाहूया'..? देव त्या श्रीमंत मनुष्याच्या घरी चोर बनून चोरी करतात आणि त्याचे सर्व काही चोरून नेतात. आता तो मनुष्य दरिद्री होतो. एक दिवस, देवांचा राजा त्याची परीक्षा घेण्यासाठी भिकारयाचे रूप घेतो. त्या माणसाकडे भिक मागतो, गरीब माणसाकडे भाकरीचा एकच तुकडा खाण्यासाठी उरलेला असतो. तो मनुष्य क्षणाचाही विचार न करता भाकरीचा तुकडा भिकाऱ्याला देऊन टाकतो. देवाच्या राजाला त्याच्या हा स्वभाव पाहून खूप आनंद होतो. देवाचा राजा त्याला त्याची सर्व संपत्ती देऊन टाकतो. आणि त्याला आशीर्वाद देतो तात्पर्य - देतो तो देव राखतो राक्षस .
