दोन मित्र
एका गावात रघु आणि श्याम नावाचे दोन शेतकरी असतात. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असतात. एक दिवस रघु काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार असतो म्हणून तो त्याचा शेत नांगरण्याचा नांगर श्यामकडे ठेवून जातो. दुसऱ्या दिवशी श्याम नांगर विकतो व त्याचे पैसे मिळवतो. काही दिवसांनी रघु त्याचे काम संपवून श्यामकडे नांगर घ्यायला जातो. श्याम त्याला म्हणतो ' नांगर उंदराने खाल्ला' . श्यामचे हे विचित्र उत्तर ऐकून रघुला धक्काच बसतो. तो श्यामला धडा शिकवण्याचे ठरवतो. त्याच दिवशी संध्याकाळी रघु श्यामच्या मुलाला स्वतःच्या एका मित्राकडे नेतो. मित्राच्या घरी ठेवतो आणि त्याला सांगतो, कि जो पर्यंत मी परत येत नाही तो पर्यंत या लहान मुलाला तुझ्या घरी ठेव'. रात्री उशिरा श्याम रघुला त्याच्या मलाबद्दल विचारतो तेव्हा राम म्हणतो. 'मुलाबद्दल विचारतो तेव्हा राम म्हणतो, ' एक पक्षी येउन तुझ्या मुलाला घेऊन गेला. ' श्याम त्याला चिडून म्हणतो पक्षी कसा काय मुलाला उचलू शकतो? त्यांचे भांडण मिटता मिटत नाही. श्याम रागाने न्यायालयात जातो. न्यायाधीशांना सर्व हकीकत सांगतो. न्यायाधीश रामला विचारतात, 'एखांदा पक्षी मुलाला कसा काय घेऊन जाऊ शकतो? हे कस शक्य आहे? रघु न्यायाधीशांना म्हणतो' जर पक्षी मुलाला घेऊन जाऊ शकत नाही तर मग उंदीर नांगराला कसा काय खाऊ शकतो? न्यायाधीशांना रघु काय बोलत आहे काहीच समजत नाही आणि ते त्याला म्हणतात,' तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? रघु त्यांना नांगराची हकीकत सांगतो. न्यायाधीशांना समजते कि नक्की काय गडबड झाली. न्यायाधीश श्यामला सांगतात' रघुला त्याचा नांगर परत दे, तो तुझा मुलगा तुला परत देईल.तात्पर्य - कोणाचाही विश्वास तोडू नये.
