कष्टाळू हरीण

कष्टाळू हरीण

bookmark

एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाला हरणांची शिकार करण्याची आवड होते. त्यामुळे अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागलेला असतो. एक दिवस हरणांचा प्रमुख राजाला जाऊन भेटतो आणि म्हणतो 'महाराज दररोज खूप हरणे आपला प्राण गमवत आहेत तर कृपा करून असे करू नका, तुम्ही त्यांची शिकार करू नका. त्यावर राजा म्हणतो कि मला रोज एक हरीण पाठून देत जा. हरणांचा प्रमुख राजाला खूप विनंती करतो कि नका करू प्राण्याची हत्त्या पण राजा ऐकायला तयार होत नाही म्हणून शेवटी हरणांचा प्रमुख तयार होते. राजा तयार होतो राजा हरणांच्या प्रमुखावर खुश होतो. राजा हरणाच्या प्रमुखाला वाचन देतो कि मि तुला कधीच मारणार नाही. आता रोज एक हरीण स्वतःहून राजासमोर हजार होई. असे अनेक दिवस चालू राहते. एक दिवस एका हरिणीचा दिवस येतो.
तिला एक छोटे पिल्लू असते. ती हरणाच्या प्रमुखाला जाऊन भेटते. ती सांगते कि महाराज मला माझ्या पिल्लाला वाढवायचे आहे. त्याचे संगोपन करायचे आहे. जर मी मृत्यू पावले तर त्याचे पालनपोषण कोण करणार? हरणाचा प्रमुख ठरवतो कि आज तो स्वतः राजाकडे जाणार हरिणीच्या ऐवजी प्रमुख राजाकडे जातो. हरणाचा प्रमुख राजाकडे जातो आणि राजाला सर्व हकीकत सांगतो. राजाला त्याचा त्याग पाहून आश्चर्य वाटते. राजा हरणांच्या प्रमुखाला म्हणतो,' माझ्या मित्र यापुढे मी कोणत्याच हरणाचे शिकार करणार नाही.' तात्पर्य - नेहमी दुसऱ्यांना मदत करावी.