जंगली बकऱ्या

जंगली बकऱ्या

bookmark

     एक गावात राम राहत होता. त्याच्याकडे खूप बकऱ्या होत्या. तो बकऱ्याचे दुध विकून पैसे कमवित असे. एक दिवस बकऱ्या घेऊन तो जंगलात गेला. बकऱ्या  नेहमी प्रमाणे चारा खाऊ लागल्या.
  
        जंगलात याच वेळी काही जंगली बकऱ्या चरत होत्या. जेव्हा हा राम पाळीव बकऱ्या घेऊन घरी निघाला. तेव्हा त्याच्या कळपात काही जंगली बकऱ्या घुसल्या. त्याच्या कळपात घुसलेल्या जंगली बकऱ्याना घरी पोहोचल्यावर त्या रामने या सगळ्या बकऱ्यांना सुरक्षित जागी बांधून टाकले.

         दुसऱ्या दिवशी अकस्मात बर्फ पडू लागला म्हणून राम आपल्या बकऱ्या चरायला बाहेर नेऊ शकला नाही. त्यांना घरातच चारा द्यावा अशा विचारात तो होता. जंगली बकऱ्या आपल्या घरी राहाव्यात असाही त्याचा विचार होता. फुकट मिळालेल्या बकऱ्यांना ठेवून घेण्यासाठी त्याने जंगली  बकऱ्यांना जादा गवत खायला दिले.
      पाळीव बकऱ्या हे सगळे बगत होत्या. पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. बर्फ पडण्याचे थांबल्यावर जंगली बकऱ्या बाहेर पळून गेल्या. रामला राग आला. तो जंगली बकऱ्यांना म्हाणाला, " मी तुम्हाला जास्त चारा खायला दिला तरी तुम्ही येथून पळून जात आहात ."
 
        जंगली बकऱ्या म्हणाल्या ,जर आम्ही तुझा बरोबर राहिलो आणि उद्या नव्या बकऱ्या कळपात आल्या तर तू त्यांना आमच्या पेक्षा जास्त खायला देणार. नव्या बकऱ्या आल्या की जुन्या बकऱ्ययांवर अन्याय  करणार. हे ऐकताच रामचा चेहरा पडला. बकऱ्या खर बोलत असल्यामुळे राम  निरुत्तर झाला. 

तात्पर्य -  आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.