डॉक्टर आणि वृद्ध स्त्री

डॉक्टर आणि वृद्ध स्त्री

bookmark

       एका गावात वृद्ध  स्त्री राहत होती. ती नेहमी आजारी पडत आसे. कालांतराने वृद्ध स्त्री अंध झाली. तिने उपचारासाठी एका डॉक्टरांना घरी बोलावले. डॉक्टर येताच घरात उपस्थित असणाऱ्या काही लोकांसमोर ती म्हणाली," डॉक्टर तुम्ही मला माझी दृष्टी परत मिळवून दिलीत तर मी तुम्हाला भरपूर धन देईन." 

      डॉक्टरने होकर दिला. उपचार सुरु झाल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टर त्या स्त्रीच्या डोळ्यावर औषध लावीत असे. घरी जाताना त्या स्त्रीच्या घरातील वस्तू डॉक्टर  चोरीत असे. सर्व काही चोरून झाल्यावर डॉक्टरने त्या स्त्रीचे डोळे पूर्ण बरे केले. 

     दिसायला लागल्यावर त्या स्त्रीच्या लक्षात आले कि, घरातील सगळ्या वस्तू गायब आहे. डॉक्टरने इलाजाची फी मागितली स्त्रीने पैसे द्यायला नकार दिला. तिला माहित होते कि, डॉक्टरच चोर आहे. तिच्याकडचे धन संपले होते.
       
     त्यामुळे ती डॉक्टरला पैसे देऊ शकत नव्हती शेवटी प्रकरण कोर्टात गेले. स्त्री म्हणाली ,न्यायधीश  महाराज मी डोळे बरे झाल्यावर पैसे द्यायचे काबुल केले होते. परंतु माझे डोळे खराब होण्यापूर्वी मी जे समान घरात पहिले होते , ते मला दिसत नाही. याचा अर्थ माझे डोळे बरे झाले नाहीत डॉक्टर निरुत्तर झाला. चोरीला त्याच्या कृतीचे फळ मिळाले होते. 

तात्पर्य - आती घाई संकटात नेई.