सोन्याची अंडी देणारी कोंबडी
एका गावात एक गरीब माणूस राहत होता. त्या माणसाकडे खाण्यासाठी घरामध्ये काहीच नाही म्हणून तो एका शेतकऱ्याकडून पोटभरण्यासाठी गहू विकत घेतो. गहू विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरसे पैसे नसे. त्याबदल्यात त्याला त्याची कोंबडी देऊन टाकतो. जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला हे समजते तेव्हा ती खूप दुखी होते.
परंतु तिला दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या बायकोला आश्चर्य वाटते कारण रात्री कोंबडीने सोन्याचे अंडे दिलेले असते. ती जादूची कोंबडी होती. ती रोज एक सोन्याची अंडे देत असे. हे असेच काही आठवडे चालू होते आणि लवकरच शेतकरी गावातला सर्वात श्रीमंत माणूस बनला.
शेतकऱ्याच्या बायको म्हणजे एक अत्यंत लोभी स्त्री होती. एक दिवस शेतकरी घरत नसताना तिला एक दृष्ट कल्पना सुचली. ती एक मोठा चाकू घेउन कोंबडीचे पोट कापयाचे. सर्व अंडी बाहेर काढावीत अशी तिची कल्पना ; परंतु ती सर्वात मोठी चूक ठरते. तिला एकही अंडे पोटामध्ये मिळत नाही. त्यानंतर कधीच सोन्याची अंडी मिळणार नसतात.
तात्पर्य -आती तिथे माती
