सुतार आणि माकड
एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले.
दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो.
जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो.
तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.
