वादक
एक ढोल वाजविणारा वादक आणि त्याच मुलगा एका यात्रेत पैसे कमविण्यासाठी गेले. आपापली वाद्ये वाजवून त्यांनी लोकांना आनंद दिला, त्यांच्या वादानावर खुश होवून लोकांनी त्यांना खूप पैसा दिला. दोघेही खुश झाले. घरी परतताना त्यांना जंगल ओलांडायचे होते. त्या जंगलात अनेक चोर राहत होते. मुलगा विचार करतो कि, आपण जंगलात अशा पध्दतीने ढोल वाजवू कि चोर आवाजाने घाबरतील. मुलगा तसा मोठ-मोठ्याने ढोल वाजवायला सुरुवात करतो. परंतु, त्याचे वडील म्हणतात- 'पोरा, अशारितीने ढोल वाजव कि चोरांना असे वाटले पाहिजे कि राजघराण्यातील कोणाची तरी कडेकोट मिरवणूक चालली आहे.' मुलगा वडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून पहिल्यासारखेच ढोल वाजवायला करून पहिल्यासारखेच ढोल वाजवायला सुरुवात करतो. त्या ढोलाचा आवाज ऐकताच चोरांना समजते कि हि मिरवणूक चालली नाही. चोर दोघांवर हल्ला करतात त्यांना लुटतात वडीलांन खूप राग येतो. ते म्हणतात, 'बघ तू जर माझ ऐकलं असतंस तर' मुलगा शरमेने मान खाली घालतो. तात्पर्य - मोठ्या माणसांचे नेहमी ऐकावे
