घाबरट शिकारी
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होते त्या गावाजवळ एक जंगल होते. त्या जंगलात एक सिंह राहत होता. जेव्हा सिंह भूक लागेल तेव्हा तो गावात जायचा आणि पाळीव प्राण्याची शिकार करून न्यायचा व शेतकऱ्यांचे नुकसान करायचा. सिंहाच्या या त्रासाला सर्व गावकरी कंटाळले होते. सगळे गावकरी या सिंहाला घाबरून राहत होते.
सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि जे कोणी सिंहाला मारेल त्याला बक्षीस द्यायला तयार झाले. तेव्हा एक शिकारी गावात आला व त्याने सिंहाला मारण्याचे आव्हान स्विकारले.
पण तो शिकारी काही फार मोठा शूरवीर नव्हता. परंतु त्याने आपण शूर आहोत असा आव आणला आणि तो जंगलात गेला. सिंहाच्या पाऊलखुणा शोधण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला.
शिकारी फिरत आसताना त्याला जंगलात एक लाकुडतोड्या भेटला. शिकाऱ्यांने त्याला विचारले कि, सिंहला पहिले का?
लाकुडतोड्या म्हणाला, चल मी तुला प्रत्यक्ष सिंहच दाखवतो. "हे ऐकताच शिकारी घाबरला. सिंहाचे दर्शन घ्यायचे या कल्पनेनेच तो घाबरला. शिकारी त्याला घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "नको धन्यवाद ! मी तुला सिंहाच्या पाऊल खुणाविषयी विचारले आहे. सिंहाच्या प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. "घाबरट शिकारी शिकार करण्याऎवजी तेथून पळून गेला.
तात्पर्य - नेहमी खरे बोलावे.
