आइची थप्पड

आइची थप्पड

bookmark

एका छोट्या गावची गोष्ट आहे. त्या गावातील एका शाळेमधील छोट्या मुलाची गोष्ट आहे. एकदा एका मुलाने वर्गातील मुलाचे पुस्तक चोरले. घरी येउन त्याने ते पुस्तक आईला दाखविले. त्याच्या आईने त्याला ओरडण्याऐवजी त्याला ते पुस्तक स्वत : कडेच ठेवायला सांगितले. त्या मुलाला वाटले की, चोरी करण्यात काहीच चूक नाही. कारण त्याच्या आईनेच त्याला प्रोत्साहन देत होती. थोड्याच दिवसात त्याने कपडे चोरले. ते त्याने आईला दाखवले. आईने त्याला रागवायचं सोडून त्याचे पुन्हा खूप कौतुक केले. काही वर्षांनी मुलगा मोठा झाला. पण त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही. पुढे तो मोठ-मोठ्या वस्तू चोरायला लागला. तो मोठा चोर बनला. पण एक दिवस तो एका चोरीमध्ये त्याला पोलिसाने पकडला गेला. पोलीस जेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जात असताना तेव्हा त्याची आई रडायला लागली. आईला रडताना पाहून तो मुलगा पोलिसांना म्हणाला, मला माझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे. तो आईच्या कानाजवळ गेला आणि कानाला कचकन चावला. त्याचे असे वागणे पाहून त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. आईने त्याला एक थोबाडीत मारली. मुलगा त्याच्या आईला म्हणाला, "हीच थोबाडीत जर तू मला पहिल्यांदा पुस्तक चोरलं होतं तेव्हा मारली असतीस तर आज ही वेळ आली नसती. "मुलाने बरोबर म्हटले होते. आईनेच त्याला चोर बनवले होते. तात्पर्य - संस्काराचे बीजे लहानपाणीच पेरले जातात.