वायफळ चर्चा

वायफळ चर्चा

bookmark

एक जंगल होते. त्या जंगलामध्ये दोन प्राणी मित्र रहात असतात. त्यांचे नाव सिंह आणि वाघ ! ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर एक संन्यासी रहात असतो. एक दिवस सिंह आणि वाघ गप्पा मारत बसलेले असतात. गप्पांचे रुपांतर थोड्याच वेळात वादात होते. वादाचे कारण असते, थंडी केव्हा पडते. वाघ म्हणतो, चंद्र जेव्हा पूर्ण होऊन पुन्हा अर्धा व्हायला सुरुवात होते तेव्हा थंडी पडते. म्हणजे पौर्णीमेकडून अमावास्येकडे जाताना थंडी पडते . सिंह म्हणतो चंद्र नव्याने पुन्हा पूर्ण व्हायला सुरुवात होते तेव्हा थंडी पडते. म्हणजे अमावास्येकडून पौर्णीमेकडे जाताना थंडी पडते. त्यांचा हा वाद चालू राहतो आणि वादाचे रुपांतर भांडणात होते. पण मध्येच दोघांच्या लक्षात येते की आपण जर एकमेकांबरोबर भांडलो तर आपल्या मैत्रीचे मध्येच दोघांच्या लक्षात येते की आपण जर एकमेकांबरोबर भांडलो तर आपल्या मैत्रीचे रुपांतर भांडणात होईल. ते दोघे शेजारच्या संन्याशाकडे जायचे ठरवतात. संन्यासी थोडा वेळ विचार करतो आणि त्यांना सांगतो, अरे..! वेड्यांनो थंडी वाऱ्यामुळे पडते चंद्रामुळे नाही. अशी चुकीची भांडण करून तुमची मैत्री तोडू नका नेहमी एकत्र राहा. सिंह आणि वाघाला संन्याशाचे बोलणे समजते आणि ते पुन्हा चांगले मित्र म्हणून राहू लागतात.