लोभी  विक्रेता

लोभी विक्रेता

bookmark

   एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.

        ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो  या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते. 
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो. 

          थोड्या  दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा  कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो. 

        थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो. 

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.