लालची कुत्रा

लालची कुत्रा

bookmark

         एका गावात एक दुकानदार मटण विकण्याचा व्यवसाय करत असतो. दुकानात काही लोक काम करत असतात आणि कोपऱ्यात एक कुत्राही बसलेलं असते. एकदा दुकानदार मटण कापतो तेव्हा काही तुकडे खाली जमिनीवर पडतात. कुत्रा ते तुकडे पाहतो. थोडाही वेळ न लावता कुत्रा तो तुकडा उचलतो आणि तेथून धूम ठोकतो.

          कुत्रा तो तुकडा घेऊन खाण्यासाठी जागा शोधत असतो तिथे त्याला तो तुकडा शांतपणे चघळत खायचा असतो. एवढ्यात त्याला त्याची सर्वात आवडती नदीपलीकडील जागा आठवते आणि तो तिकडे पळू लागतो. नदी ओलांडताना तो पाण्यात डोकाऊन पाहतो तर त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसते पण त्याला वाटते तो कुणी दुसरा कुत्रा आहे. 

           त्याच्याकडील मटणाचा तुकडा आपण घेऊ कारण तो पण त्यालाच पाहिजे असतो आणि तो त्याच्यावर भुंकू लागतो. त्याचा मटणाचा तुकडा पाण्यात पडतो आणि कुत्रा मटणाचा तुकडा गमावतो.


तात्पर्य -जेवढ मिळाले तेवढ्यात सामाथान मानव जास्त गोष्टीचा हव्यास करू नये .