राक्षस आणि राजा
एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो 'आता मी तुला खाणार आहे.' राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन.
राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस ?
राजकुमार त्याला म्हणतो,' माझ्या पोटाच्या बेंबीत हिरा आहे आणि तेच माझ मोठ शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही.
हे सर्व राक्षसाला खरच वाटले आणि तो राजकुमारला सोडून देतोः परंतु प्रत्यक्षात राजकुमारच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते. ते राजकुमारने केलेले एक नाटक असते शेवटी त्याला त्याचे हजरजबाबिपनाचेच शस्त्र वाचवते.
तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.
