मुले आणि गृहस्थ

मुले आणि गृहस्थ

bookmark

एका गावात एक कुटुंब राहत होते. त्या गृहस्थला चार मुले होती. ती मुले खूप भांडखोर होती. ती सतत एकमेकांमध्ये भांडत असत. मुलांच्या भांडखोर वृत्तीला तो माणूस कंटाळलेला होता. एके दिवशी त्याने मुलांना धडा शिकवण्यासाठी ठरविले. त्याने मुलांना सांगितले की, प्रत्येकाने एक-एक काठी घेऊन या. सगळी मुले काठी घेऊन आली. सगळ्यांना काठ्या घेऊन त्यांचा एक गठ्ठा वडिलांनी बांधला. वडील मुलांना म्हणाले कि, "मला असे वाटते की तुम्ही प्रत्येकाने हा काठ्यांचा गठ्ठा तोडण्याचा प्रयत्न करावा. "प्रत्यकाने तो काठ्यांचा गठ्ठा तोडण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाच तो गठ्ठा तुटला नाही. थोड्या वेळाने वडिलांनी प्रत्येकाला एक काठी दिली आणि तोडायला सांगितली.
सगळ्यांनी आपापली काठी सहजतेने तोडली. हे पाहून वडील मुलांना म्हणाले, जेव्हा तुम्ही गाठ्ठयामध्ये बांधलेल्या काठ्या तोडण्याचे प्रयत्न करत होता तेव्हा त्या तुटल्या नाहीत. पण जेव्हा त्यांना वेगळ्या करून तोडण्याचा प्रयत्न केला तर त्या पटकन तुटल्या. अशा प्रकारे तुम्ही जर एकमेकांमध्ये मिळून मिसळून एकत्र राहिलात तर कोणी तुमचे काहीच वाईट करू शकत नाही. पण एकटे असला तर कोणीही तुम्हाला सहजरीत्या नुकसान पोहचवेल. हे ऐकून मुलांना त्यांची चूक उमगली आणि पुन्हा त्यांनी आपापसांत भांडणे केली नाही . तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.