मुंगी व कबुतर

मुंगी व कबुतर

bookmark

एका मुंगीला खूप तहान लागली म्हणून ती नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेली. तेंव्हा तिचा पाय घसरला व ती पाण्यात पडली. ते जवळच झाडावर बसलेल्या कबुतराने पाहिले बुडणाऱ्या मुंगीची त्याला दया आली.
पटकन त्याने झाडाचे एक सुकलेले पान मुंगीजवळ फेकले. मुंगी पानावर चढली आणि सुरक्षितपणे ती काठावर पोहोचली. तेवढ्यात तेथे एक फासेपारधी कबुतराला पकडण्यासाठी आला. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावली.
त्यामुळे तो जोरात ओरडला. कबुतर त्यामुळे सावध झाले व फासेपारध्याला पाहून पळून गेले. अशा प्रकारे कबुतराच्या सत्कर्माचे फळ त्याला लगेच मिळाले व त्याचे प्राण वाचले. तात्पर्य - संकटकाळी मदत करणारे हेच खरे मित्र