माकड  आणि  डॉल्फिन

माकड आणि डॉल्फिन

bookmark

             एकदा एक नावाडी समुद्रकिनारी प्रवासाला निघाला. प्रवासात त्याने सोबत म्हणून एक माकड बरोबर नेले. प्रवासात असताना जोरदार वादळ सुटले. वादळामुळे बोट समुद्रात बुडते. नाविक पोहत किनाऱ्याला जावू लागला पण माकडाला जाता येईना हे सर्व डॉल्फिन मासा पाहत होता. डॉल्फिन माशाला दया आली व त्यांना  मदत करण्याचे ठरवते.
       
   एका डॉल्फिन माशाने माकडाला पाठीवर घेतले. डॉल्फिनने माकडाला माणूस समजून पाठीवर घेतले. 

        डॉल्फिनला माणसाला खूप प्रश्न विचारायचे होते. डॉल्फिन पोहत किनाऱ्याकडे निघाला. त्याने माकडाला विचारले " तू अथेन्स शहरात राहतोस का?" 

             माकडाने क्षणभर विचार केला आणि तो खोटे बोलला. माकड म्हणाला, होय मी अथेन्स शहरातील एका मोठ्या सरदार घराण्यात वाढलो आहे." 
         डॉल्फिनने त्याला अथेन्स शहराजवळील प्रसिद्ध बंदराविषयी प्रश्न विचारला "तुला पायरायस माहित आहे का?"  माकडाला वाटले कि, पायरायस हा माणूस आहे. माकड पुनः एकदा खोटे बोलला हो. मी त्याला चांगलाच ओळखतो. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मी त्याला भेटायला कायमच उत्सुक असतो.

        डॉल्फिनला कळून चुकले कि माकड खोटे बोलत आहे. त्याने माकडाला तत्काळ पाण्यात फेकले. माकडाला त्याच्या खोटे बोलण्याची शिक्षा मिळाली. जर तो डॉल्फिनशी खरे बोलला असता तर तो किनाऱ्यावर सुखरूप पोहचला असता. जे आपणास माहित नाही ते माहित असल्याचा आपण करू नये. 

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे .