भोंदू साधू आणि कबुतर
एका गावात एक राजा राहत होता. त्याचाकडे कबुतरांचा थवा असतो. कबुतरांचा राजा रोज आपल्या थव्यासह एका साधूच्या झोपडीत प्रवचन ऐकायला जात असे. एक दिवस तो साधू त्याची झोपडी कायमची सोडून गेला. काही दिवसांनी तेथे एक भोंदू साधू राहण्यासाठी येतो. तो तेथे दररोज येणारा कबुतरांचा थवा पाहतो. त्या भोंदू साधूला काबुताराचे मटण खूप आवडत असते. तो कबुतरांचा थवा पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटत असे . तो त्या कबुतरांना मारून त्यांचे मटण खाण्याचे प्रयत्न करत असतो. दुसऱ्या दिवशी साधू मटणाची सर्व तयारी करतो आणि कबुतरांची वाट पाहत असतो. सवयीने काही कबुतरे तिथे यायला लागतात. कबुतरांच्या राजाला मसाल्याचा वास येतो. तो सर्व कबुतरांना सावध करून झोपडीपासून दूर राहायला सांगतो. भोंदू साधूच्या लक्षात येते कि आपली योजना कबुतरांनी ओळखली आहे. साधू कबुतरांच्या मागे पळू लागतो. कबुतरांना शोधू लागतो. साधू कबुतरांच्या राजाला काठी फेकून मारतो पण राजा काठी चुकवतो. कबुतरांचा राजा साधूवर चिडतो आणि म्हणतो 'तू या पापासाठी नरकात जाशील, मी तुझे खरे रूप सर्वासमोर उघडकीस आणतो,' हे ऐकून साधू खूप घाबरला आणि तेथून पळून जातो .
