बोलणारे हरीण

बोलणारे हरीण

bookmark

एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक हरीण राहत होते. ते सामान्य हरीण नव्हते. ते खूप ताकतवान आणि माणसांप्रमाणे बोलणारे हरीण होते. एक दिवस एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात येतो. राजा त्या बोलणाऱ्या हरिणाला पाहतो आणि बाणाचा नेम धरतो. हरणाला समजते कि राजाने आपल्या दिशेने नेम धरलेला आहे. ते पाहून हरीण जोरात धावते. राजपण त्याच्या मागे धावत असतो. राजा हरिणाच्या मागे धावत असताना पुढे एक भला मोठा खड्डा येतो पण त्याला समजत नाही. धावता धावता राजा त्या खड्ड्यात पडतो. हरणाला राजाची दया येते. हरीण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते, 'मला वाटते कि तुला मोठी जखम झाली नसेल. मी तुला येथून बाहेर काढतो.' हरीण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते, 'मला वाटते कि तुला मोठी जखम झाली नसेल. मी तुला येथून बाहेर काढतो.' राजाला हरिणाचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटते. त्याला समजते कि हे हरीण सामान्य नाही. हरीण राजाला बाहेर निघण्यासाठी मदत करते. राजाला आपल्या कृत्याची लाज वातू लागते. तो हरिणाची माफी मागतो. तात्पर्य - दुसर्यांना नेहमी मदद करावी.