दिसते तसे नसते म्हणून जग फसते
हरदासबुवांचे वकृत्व एका देवळात एक हरदासबुवा म्हणून होते. त्यांचे शरीर धष्टपुष्ट व उंच शरीरयष्टी असलेल् होते. त्यांची दाढी खूप मोठी म्हणजे छातीवर रूळणारी होती. त्यांचे केस संन्याशासारखे खांद्यांना टेकणारे होते. त्यांचे वकृत्व देखील प्रभावी होते त्यामुळे त्यांच्या कीर्तनाचा परिणाम श्रोत्यांवर चांगला होत असे. असेच त्यांचे कीर्तन चालू असताना ते श्रोत्यांना म्हणाले "या जगात दिसते तसे नसते म्हणून जग फसते. तसे पाहिले तर या मृत्यूलोकी कुणीही कुणाचा नाही. आपल्याला वरचे बोलावणे केव्हा येईल याचा देखील भरवसा देता येत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी परमेश्वराची भक्ती करणे गरजेचे आहे. अशा मोलाच्या गोष्टी आपले थोर मंडळी संत आपल्याला सांगून गेले आहे." सर्वजण कीर्तन मन लावून ऐकते होते परंतु तेथील एकाच बाईच्या डोळयातून अश्रू येत होते. त्या बाईच्या डोळयात अश्रू पाहून आपले वकृत्व फारच प्रभावी आहे असे बुवांना वाटले व त्यांना कीर्तन करण्यास अजूनच उत्साह वाढला. शेवटी कीर्तन संपल्यावर सर्वजण आरतीत पैसा टाकून व बुवांना नमस्कार करून आपापल्या घरी निघाले. सर्वात शेवटी ती अश्रू ढाळणारी बाई आपले डोळे पदराला पुसत बुवांना नमस्कार करायला गेली. ती जवळ जाताच बुवा तिला म्हणाले "बाई मा उपदेशाचा तुमच्यावर फारच परिणाम झाला आहे कारण तुम्ही सारख अश्रू पुसत होत्या." परत एकदा त्या बाईने एक हुंदका गिळत बुवांना म्हंटले "छे हो बुवा मी तुमचे काहीच बोलणे ऐकले नाही. कारण तुमचा उपदेश ऐकायला माझ मन अजिबात स्थिर नव्हत." ते ऐकून बुवा फार चकीत झाले व तिला म्हणाले "पण मग तुम्ही माझं कीर्तन चालू असताना सारखे रडत का होता." यावर ती बाई त्यांना म्हणाली "बुवा तुमच्याकडे बघून रडू नको तर कोणाकडे बघून रडू. मागच्याच महिन्यात बक वर एक भयंकर रोगाची साथ आली होती व त्यात माझा एक गण्या बोकड होता तो त्यात मरण पावला. त्याची दाढी अगदी तुमच्यासारखीच लांब होती त्यामुळे तुम्हाला पाहून मला सारखी त्याची आठवण येत होती म्हणून मी सारखी तुमच्याकडे बघूत रडत होते.
