दयाळू कासव

दयाळू कासव

bookmark

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काही व्यापारी नावेतून जात असतात. नावेतून प्रवास करीत असताना अचानक समुद्रात वादळ घोंघावू लागते. तेव्हा वादळ इतके जोरात येते की त्याची नाव टिकाव धरू शकत नाही. शेवटी नाव बुडते. व्यापारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतात. व्यापाऱ्यांची, जीव वाचवण्यासाठी चाललेली घालमेल, त्यांचे प्रयत्न पाहून एक कासव त्यांना मदत करण्याचे निर्णय घेते. कासव व्यापाऱ्यांजवळ जाते. कासव त्यांना स्वतःच्या पाठीवर बसण्यास सांगते. ते व्यापारी त्याच्या पाठीवर बसतात. कासव त्यांना किनाऱ्यावर सुखरूप आणून सोडते इतक्या मोठ्या संकटात मदत केल्याबद्दल व्यापारी कासवाचे आभार मानतात. थोड्या वेळाने व्यापाऱ्यांना खूप भूक लागते. अन्न कसे मिळवायचे याची ते चर्चा करतात. ते इकडे तिकडे खाण्यासाठी काही शोधू लागतात. त्याचं हे बोलन ऐकुन कासवाला वाईट वाटते. कासव त्यांना म्हणतो कि 'तुम्ही खाद्य म्हणून मला खाऊ शकता.' कासवाचे असे बोलणे ऐकून व्यापाऱ्यांना वाईट वाटते आणि ते त्याला म्हणतात 'तू आमचा जीव वाचवला आहेस. आम्ही तुला नाही मारू शकत.' अशाप्रकारे त कासवाचा निरोप घेऊन तेथून निघून जातात तात्पर्य - संकटकाळी दुसर्यांना मदद करावी