कृतघ्न चाकराची गोष्ट
एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?’’ सात वेळा काय?’’ येशूने म्हटले,‘‘सात वेळा नव्हे, तर साताच्या सत्तर वेळा!’’ यावरुन, येशूला असे म्हणावयाचे होते की, आपण नेहमी क्षमा करावी. तेंव्हा येशूने ही गोष्ट सांगितली.
येशू म्हणाला,‘‘देवाचे राज्य एका राजासारखे आहे. त्याला आपल्या चाकरांकडून हिशेब घ्यावा असे वाटले. त्याच्या एका चाकराकडे 200,000 वर्षांच्या वेतनाइतके इतके फार मोठे कर्ज होते.
‘‘हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हटले की, हया मनुष्यास व त्याच्या कुटुंबास गुलाम म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करुन घ्यावी.’’
‘‘तो चाकर राजासमोर आपले गुडघे टेकून म्हणाला, कृपया माझ्यावर दया करा व मला कही वेळ द्या, म्हणजे मी तुमचे सर्व कर्ज फेडीन’’ राजाला त्या चाकराची दया आली व त्याने त्याला त्याचे सर्व कर्ज माफ केले व त्याला जाऊ दिले.’’
‘‘ परंतु हा चाकर बाहेर गेला असताना त्याला त्याच्या सोबतीचा एक चाकर भेटला ज्याच्याकडून त्याचे सुमारे चार महिन्यांच्या वेतनाइतके कर्ज येणे होते. त्या चाकराने आपल्या सोबतीच्या चाकराला पकडले आणि म्हणाला,‘आताच्या आता माझे घेतलेले पैसे मला दे!’’
‘‘त्याचा सोबतीचा चाकर गुडघे म्हणाला, ‘‘मला थोडा समय द्या व माझ्यावर कृपा करा, म्हणजे मी तुझे सर्व कर्ज फेडीन’’ परंतु त्याऐवजी, त्याने आपल्या सोबतीच्या चाकराला सर्व कर्जाची फेड होईपर्यंत तुरुंगात टाकले.
‘‘दुस-या चाकरांनी हे पाहिले व त्यांना फार वाईट वाटले. त्यांनी राजाकडे जाऊन सर्वकांही सांगितले.’’
राजाने त्या चाकरास बोलावून घेतले व म्हटले,‘अरे दुष्ट चाकरा!’’ तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व कर्ज तुला सोडिले होते. तशी तूही आपल्या सोबतीच्या चाकरावर दया करावयास पाहिजे होती. राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.’’
तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.’’
बायबल कथा :मत्तय 18 : 21 - 35
