अकबर बादशहाचे स्वप्न

अकबर बादशहाचे स्वप्न

bookmark

एका रात्री, अकबर बादशहाने एक विचित्र स्वप्न बघितले की त्याचा एक दात सोडून बाकी सगळे दात पडले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी, त्याने राज्यातील सर्व विख्यात ज्योतिष्यांना बोलविले आणि त्यांना आपल्याला पडलेल्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारला. सर्व ज्योतिष्यांनी आपापसात विचार विनिमय करून एकमत होऊन बादशहांना सांगितले, 'महाराज, याचा अर्थ असा आहे की तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आधी मरून जातील'. हे ऐकून बादशहा खूप रागवतो आणि सर्व ज्योतिष्यांना दरबारातून निघून जाण्यास सांगतो. त्यांच्या जाण्यानंतर बादशहा बिरबलला बोलवून आपल्या स्वप्नाबद्दल सांगून त्याचा अर्थ विचारतो. काही वेळानंतर बिरबल बोलतो 'महाराज, आपल्याला पडलेले स्वप्न अत्यंत शुभदायक आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक बिरबलने हुशारीने सांगितलेल्या अर्थामुळे महाराज खुश झाले आणि बिरबलला उत्तम बक्षिस दिले.